महाराष्ट्र

डॉ अमित देवकुळे यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम अवॉर्ड जाहीर

डॉ अमित देवकुळे यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम अवॉर्ड जाहीर

हातकणंगले कवि सरकार इ़गळी

ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड दिल्ली कडून दिला जाणारा डॉ ए पी जे अब्दुल कलाम अवॉर्ड महाराष्ट्रातील पुणे येथील लाईफ कोच डॉ अमित देवकुळे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन डॉ सुषमा यांनी दिली.सदर पुरस्कार इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे 22 जानेवारी रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
अमित देवकुळे हे एक उत्कृष्ट कवी लेखक, गायक संगीतकार याबरोबरच लाईफ कोच समुपदेशक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. पुण्यात असणारे डॉ अमित देवकुळे यांनी आजपर्यंत दहा हजारापेक्षा जास्त दिव्यांग तथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. नैराश्यातून प्रवास करणाऱ्या अनेक मुलांना त्यांनी आपल्या कौशल्या च्या जोरावर सकारात्मक विचारसरणीत बांधून नवं जीवन प्रदान केले आहे. शारीरिक दृष्टीने अकार्यक्षम असलेल्या हजारो मुलांच्या नेतृत्व गुणांना वाव देऊन त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन त्यांनी केल आहे एवढंच नाही तर पॅंचेवीस पेक्षा जास्त संस्था आणि संघटनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम अगदी मोफत पणे सामाजिक कार्य म्हणून केल आहे त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अल्फा झी सा रे गा मा गौरव पुरस्कार, कला उपासक पुरस्कार,पुणे ज्ञानभूषण पुरस्कार,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार,शिक्षा भारती पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार,राष्ट्रीय रत्न पुरस्कार, राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार, तसेच उत्कृष्ट नेतृत्वा बद्दल कॅलिफॉर्निया मधील कॉग्नीटिव्ह एक्सचेंज या संस्थेने उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने चार वेळा गौरव केला आहे. भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या नावाने पोस्टल स्टॅम्प काढून त्यांचा अनोखा गौरव केला आहे तसेच सदर स्टॅम्प ऑफ द वर्ल्ड मध्ये नोंद झालेली आहे ही अभिमानाची बाब आहे .प्रमाणित कोच असणारे डॉ अमित हे अलायन्स ग्रुप कॅनडा आणि मार्शल गोल्डस्मिथ स्टेकहोल्डर्स सेंटरेड कोचिंगशी संलग्न आहेत. मास्टर स्पिरिट लाईफ कोच हे आगळं वेगळं वैशिष्ट्य पूर्ण कोर्स पूर्ण करणारे व्यक्ती म्हणून डॉ अमित देवकुळे यांचा उल्लेख केला जातो

जागतिक संसदेने त्यांना सदस्यत्व बहाल केल आहे. डॉ अमित देवकुळे हे ग्लोबल सिटीजन गोल्ड मेम्बर आहेत आणि पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे.

डॉ अमित देवकुळे यांनी मराठी बरोबरच इंग्रजी भाषेत अनेक कविता लिहिल्या असून त्यांच्या कविता न्यूयार्क टाइम ने प्रकाशित केल्या आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.एस सेवन राष्ट्रीय कविता स्पर्धेत त्यांना कौतुक प्रमाणपत्र, लेट्स राईट प्रकाशन, hubooktique.com कडून प्रदान करण्यात आले आहे.एक उत्कृष्ट कवी लेखक समुपदेशक संगीतकार, असलेले प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड कडून डॉ ए पी जे अब्दुल कलाम अवॉर्ड जाहीर झाला आहे.
त्याच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन डॉ सुषमा यांनी डॉ अमित देवकुळे यांचे अभिनंदन केल आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *